9890803089 chaitanyantanda30july2019@gmail.com
स्थापना: 2019

चैतन्यतांडा नं.४ ग्राम पंचायत कार्यालय

चैतन्यतांडा नं.४

स्थापना: 2019 | Established: 2019

आकडेवारी / Statistics

1,356
एकूण लोकसंख्या
Total Population
1,132
एकूण मतदार
Total Voters
10
पदाधिकारी
Officials
4
विकासकामे
Development Works

ग्रामपंचायत विषयी / About Gram Panchayat

चैतन्यतांडा नं. ४ ग्रामपंचायतीची स्थापना ३० जुलै २०१९ रोजी करगांव ग्रामपंचायतीमधून विभाजन होऊन झाली. यापूर्वी ही वस्ती करगांव तांडा नं. ४ म्हणून ओळखली जात होती. शासनस्तरावरील नियमांची पूर्तता, श्री. दिनकर धनसिंग राठोड यांचे प्रयत्न आणि आमदार मा. श्री. मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठबळामुळे ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्थापना शक्य झाली.
स्थापनेनंतर अल्पावधीतच ग्रामपंचायतीने विकासकामे व नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून तालुक्यात आदर्श व स्वतंत्र ओळख निर्माण केली असून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
सध्या ग्रामपंचायतीचे नेतृत्व लोकनियुक्त महिला सरपंच सौ. अनिता दिनकर राठोड करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण व डिजिटल विकास क्षेत्रांत लक्षणीय प्रगती झाली आहे.
त्यांचे पती मा. दिनकर राठोड हे माजी सोसायटी चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते असून तांडा-विकास आणि नवीन ग्रामपंचायतींच्या निर्मितीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
सौ. व श्री. राठोड हे सन २०१० पासून सलग लोकनियुक्त असून चैतन्यतांडा ग्रामपंचायत आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

संपर्क माहिती / Contact Information

पत्ता / Address
चैतन्य तांडा नं-४ पो ,करगांव ता,चाळीसगांव जि जळगाव ४२४११६
फोन / Phone
स्थान / Location
चैतन्यतांडा नं.४
स्थापना वर्ष / Established Year
2019